Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यातकोल्हापुरातही शिवसेनेने दुसरे मंत्रीपद द्यावे - सुजित चव्हाण नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्मचाऱ्यांच्या कष्टाची संस्थेला जाणीव

schedule29 Nov 20 person by visibility 628 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करुन ‘गोकुळ’ला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी सेवेतून निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटते. तथापि संघाच्या नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यावर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव ‘गोकुळ’ नेहमीच ठेवेल.’असे प्रतिपादन संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले. 

‘गोकुळ’मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम झाला. ३२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नरके म्हणाले, ‘ या कर्मचाऱ्यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाची कामे केली. आज कर्मचाऱ्यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ परिवारासाठी द्यावा.’

याप्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई,रामराजे कुपेकर-देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम.पाटील, प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील आदी उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes