सातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिक
schedule12 Dec 25 person by visibility 543 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत संबंधीत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली करू नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.नवी दिल्लीत केंद्रीय सडक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी खासदार महाडिक यांनी महामार्गाच्या कामाकडे लक्ष वेधले.यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. सातारा ते कागल महामार्गाचे काम प्रचंड रखडले असून, संबंधीत ठेकेदाराला ताबडतोब निलंबित करावे आणि नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली। दरम्यान गेल्या सहा महिन्यात केवळ दोन टक्के काम केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीबाबतही योग्य कार्यवाही करू, असे सांगितले.