वालावालकर हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्थोपेडिक सर्जन सेवा
schedule10 Mar 25 person by visibility 27 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तब्बल तीन पिढया सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणाऱ्या शिवाजी उद्यम नगरातील पंत वालावाकर हॉस्पिटलमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाची अर्थोपेडिक सेवा - ऑपरेशन सर्जरी उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेण्याबरोबरच लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि आर एन कॉपर मुंबई या वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठेच्या दवाखान्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेले कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. आर्यन गुणे या ठिकाणी सेवा देणार आहेत.
हॉस्पिटलचे प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी , नेत्र विभागाचे वीरेंद्र वीरेंद्र वणकुंद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे केले. यावेळी संवाद साधताना गुणे यांनी आपल्या जन्म गावातच मला या आधुनिक सेवा सुविधा आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी देण्याची संधी देण्यास संधी उपलब्ध होत आहे ही माझ्यासाठी एक मोलाची बाब असून मी अधिकाधिक कौशल्याने माझे योगदान देत राहील असे मनोगत व्यक्त केले
संतोष कुलकर्णी यांनी डॉ. गुणे यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय सेवा सुविधा आता पंत वालावलकर हॉस्पीटल मध्ये उपलब्ध झाली आहे . त्याचबरोबर या ठिकाणी आता नेत्र - ई एन टी - दंत चिकित्सा वैदकीय उपचार सेवा समर्पित भावनेने कार्य करणारी तगडी डॉक्टरांची आणि सहकाऱ्यांची टीम कार्यात आहे त्यामुळे या ठिकाणी या सर्व सेवा सुविधांचा लाभ रुग्ण आणि नातेवाईकांनी घ्यावा असे आवाहन केले.