फुलेवाडी सोसायटीसाठी रविवारी मतदान
schedule23 Sep 23 person by visibility 169 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केलेल्या फुलेवाडी सहकारी हौसिंग सोसायटीसाठी रविवारी (२४ सप्टेंबर २०२३ ) मतदान होत आहे. या सोसायटीच्या मतदानासाठी ४५८ सभासद पात्र आहेत. फुलेवाडी सहकार समूहाच्या नेतृत्वाखाली कै.श्रीपतराव बोंद्रे संस्थापक सत्तारुढ पॅनेल विरोधात श्री गुरुदेव दत्त परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये लढत आहे. सत्तारुढ पॅनेलचे नेतृत्व माजी नगरसेवक राहुल माने, बांधकाम व्यावसायिक कृष्णात पाटील, नागोजीराव पाटील करत आहेत. विरोधी पॅनेलचे नेतृत्व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, रामचंद्र यादव आदी करत आहेत. महात्मा फुले विद्यालयात मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एम. एम. पाटील आहेत.