संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान
schedule25 Sep 23 person by visibility 248 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार घोडावत यांना प्रदान करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे कार्यक्रम झाला.
याप्रसंगी घोडावत म्हणाले, ‘मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’