+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule30 May 23 person by visibility 493 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दहावीनंतर प्रत्येकाच्या वाटा वेगळया झाल्या, कोण सरकारी नोकरीत तर कोण व्यापार-व्यवसायात उतरले. जवळपास दोन तपानंतर दहावीच्या त्या साऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र यायचे ठरविले आणि नियोजनानुसार सगळे एकवटले. एक दिवस माझा म्हणत शालेय आठवणी जागविल्या. मित्रांसोबत मौजमजा  करत स्नेहमेळाव्यात रंग भरला. नागाव हायस्कूल नागावच्या १९९९-२००० मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झााला. 
 हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नागाव हायस्कूल नागावच्या १९९९-२००० मधील इयत्ता दहावीत शिकणारे सगळे मित्रमंडळी २३ वर्षानंत एकवटले. बऱ्याच वर्षांनी सगळेजण एकवटल्यामुळे आनंदाला ऊधाण आले. गप्पा,  आणि जुन्या आठवणींना उजाळा देत हा दिवस साजरा केला. ताराबाई पार्क येथील हॉटेल वूडलँड येथे हा स्नेहमेळावा रंगला. 
दहावीनंतर प्रत्येकाच्या करिअरच्या वाटा वेगळया झाल्या. आज विविध क्षेत्रात सक्रिय असलेले मित्र दोन दशकानंतर एकत्र आल्यामुळे साऱ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. शालेय जीवनातील आठवणी वेगळया अनुभूती देण्यात ठरल्या. स्नेहमेळाव्यानिमित्त सगळया मित्रांची झालेली भेट नवीन ऊर्जा निर्माण करणरी आहे. स्नेहमेळाव्यातील प्रसंग आयुष्यभर उत्साह देत राहतील’अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी सगळया मित्रांनी एकत्र येत प्रकाश कांबळे यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली. 
या स्नेहमेळाव्यासाठी दिपक गायकवाड, युवराज सावंत, राकेश चव्हाण, सुजाता गायकवाड, गीतांजली वाकसे, सरला कांबळे  यांनी पुढाकार घेतला. माणिक सावंत यांनी आभार मानले.