केआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभ
schedule31 Aug 25 person by visibility 70 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने झाली.५ दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे (इंडक्शन सेशन ) उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या विशेष सत्राच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले,अन्य विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकीच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. वनरोटी यांनी केआयटी ची संस्कृती, कामाची पद्धत, पारदर्शकता,शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला वापर तसेच केआयटी च्या माजी विद्यार्थ्यांच्या विविध ‘माईल स्टोन’ ची नवीन विद्यार्थ्यांना माहिती दिली. केआयटीचा परिसर हा इको फ्रेंडली असून तो अभ्यासासाठी अत्यंत पूरक आहे त्यामुळे या परिसराची काळजी घेणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. भविष्यात आपल्या स्वप्नपूर्ती मध्ये केआयटी भक्कमपणे सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ.आसिफ कुरेशी यांनी विभागातील रचनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी रजिस्ट्रार डॉ.डी.जे. साठे, संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ.जितेंद्र भाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अभिजीत उळागड्डे यांनी स्वागत केले. प्रा. शुभदा सावरखांडे यांनी सूत्रसंचालन केले.