विद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुण कौशल्य ओळखून स्वतःसह समाजाचा विकास करावा -डॉ.संपत खिलारे
schedule14 Mar 25 person by visibility 225 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निसर्गाने प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट गुण, कौशल्ये दिलेले असतात ती प्रत्येकाने ओळखावीत आणि त्या आधारे स्वतःचा आणि समाजाचा विकास करावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारे यांनी केले.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम होत्या. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या गुण ,कौशल्य यांना वाव देणारा कार्यक्रम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात बारावी कॉमर्स बरोबरच बी. कॉम.,बी. बी.ए., एम.बी.ए., एम.कॉम. मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आणि सत्कार करण्यात आला याबरोबरच फुटबॉल, अथलेटिक्स, तायक्वांदो, क्रिकेट ,बॉक्सिंग, लॉन टेनिस, रायफल शूटिंग, बॅडमिंटन, या खेळामधील विद्यापीठ ,राज्य व राष्ट्रीय स्तरावरवरील विजेत्या खेळाडूंचा सत्कार झाला क्षितिज पाटील आणि ऋत्विक पाटील यांना दिग्विजय खानविलकर पुरस्कार देण्यात आला.
राज्य अथलेटिक्स संघटनेवर खजिनदारपदी निवड झालेल्या प्रा. पी.एम. मांगोरे पाटील,आय. सी.एस. एस. आर. कडून डॉ. एस. एस. देसाई यांना बारा लाख रुपयांचा प्रोजेक्ट मंजूर झाल्याबद्दल, प्रा. डॉ. अशोक बन्ने यांना शैक्षणिक शिव पुरस्कार, डॉ.ताहीर झारी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी आविष्कार या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेसाठी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार झाला.
स्वप्निल गायकवाड आणि संजय लाड उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम ,सदस्य ॲड .अमित बाडकर, ॲड.वैभव पेडणेकर,बाळासाहेब कुंभार कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य एम.पी. वंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या वर्षा मैंदर्गी यांनी प्रास्ताविक केले. जिमखाना प्रमुख डॉ. के.जी. कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा .बाबासाहेब कश्यप ,प्रा.अश्विनी मगदूम,प्रा.माधवी कोगेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.आर.एस.नाईक यांनी आभार मानले.