राज्य ज्युनिअर फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ उपांत्य फेरीत
schedule27 May 23 person by visibility 223 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शिरपूर (धुळे) येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा संघाने औरंगाबाद जिल्हा संघाचा ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे
आज शनिवारी कोल्हापूर संघाचा सामना औरंगाबाद संघाबरोबर झाला. हा सामना कोल्हापूर संघाने ३-०गोलने जिंकला. कोल्हापूर संघाच्या स्वरूप बागडीकरणे २५ व्या मिनिटाला ईशान तिवलेने दिलेल्या पासवरती छोट्या डी मधून गोल नोंदवून संघास आघाडी मिळवून दिली.हर्षवर्धन पाटीलने ३४ व्या मिनिटाला आदित्य पाटील याने दिलेल्या पासवरती गोल नोंदविला तर उत्तरार्धात ईशान तिवलेने आदित्य पाटीलने दिलेल्या पासवर ५४ व्या मिनिटाला गोल करून संघास 3-0 गोलफरकाने आघाडीवर ठेवले. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली.
आघाडी फळीत गंधर्व के, ईशान तिवले व स्वरूप बागडीकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
मधल्या फळीत आदित्य पाटील, हर्षवर्धन पाटील व श्रेयस निकम यांनी आघाडी फळीला उत्तम पास दिले. बचाव फळीमध्ये रोहित जांभळे, आयुष्य शिंदे, शुभम कांबळे व प्रतीक पाटील यांनी भक्कम बचाव केला.
संघाचे मार्गदर्शक संतोष पवार व व्यवस्थापक म्हणून अमित शिंत्रे यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले.
२९ मे रोजी सकाळी आठ वाजता मुंबई संघाबरोबर उपांत्य सामन्यासाठी लढत होणार आहे.