विश्वास पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule18 Mar 25 person by visibility 314 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत शिरोली दुमाला येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. शिबिरात ५७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
गोकुळचे चेअरमन डोंगळे म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. रक्तदानाबद्दल जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, हे निश्चितच समाजाभिमुख कार्य आहे.
यावेळी ऊर्मिला पाटील, तुकाराम पाटील, सरपंच सचिन पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील व संपूर्ण पाटील कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अर्पण ब्लड बँक व श्री महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले. वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, चेतन नरके, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, मुरलीधर जाधव, क्रांतिसिंह पाटील, सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, सत्यजित पाटील, अमर पाटील, कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील, दादासो लाड, एस.डी.जरग, बुद्धीराज पाटील, सुभाष पाटील, नंदकुमार पाटील, माधव पाटील, एस.के.पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच रयत कृषी संघाचे संचालक उपस्थित होते.