शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य, नामविस्ताराचा प्रयत्न झाल्यास कोल्हापुरी हिसका
schedule15 Mar 25 person by visibility 212 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रयत्न झाल्यास कोल्हापुरी हिसका दाखवू.’असा इशारा शिवप्रेमींनी दिला. ‘शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे. सर्वंकष विचार करुन नाव दिले आहे. नामविस्तारामुळे विद्यापीठाची ओळख हरवेल. यामुळे नावात बदल किंवा नामविस्तार विषय उपस्थित होऊ नये. तसा प्रयत्न झाला तर जोरदार विरोध करू.’असा निर्धार ही व्यक्त करण्यात आला.
दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, संशोक व विविध सामाजिक संस्था-संघटनांची बैठक झाली. डॉ. भालबा विभुते यांनी विद्यापीठ निर्मितीचा इतिहास सांगितला. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी, ‘शिवाजी‘हीच विद्यापीठाची खरी ओळख आहे. त्या नावामध्ये आदरयुक्त भाव आहे, प्रेरणा आहे. यामुळे नामविस्ताराचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी निवेदन देऊ.’ डॉ. रमेश जाधव, डॉ. वसंतराव मोरे यांनीही नामविस्ताराला विरोध केला. डॉ. विलास पोवार यांनी, ‘नामविस्ताराची मागणी करणारे जेम्स लेन प्रकरणी कोठे होते ?’असा सवाल केला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘नामविस्ताराचा प्रयत्न झाल्यास कोल्हापुरी हिसका दाखवू.’
बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, बैठकीला माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, सुरेश शिपूरकर, बाबूराव कदम, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, विजय देवणे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. अजित चव्हाण, गणी आजरेकर, बबन रानगे, दगडू भास्कर, संभाजी जगदाळे, हर्षल सुर्वे सरला पाटील, पद्मा तिवले, शैलजा भोसले, सुनीता पाटील, शशिकांत पाटील, जयकुमार शिंदे, रवींद्र चव्हाण, प्रविण पाटील, शुभम शिरहटटी, विकास जाधव आदी उपस्थित होते.
……………
शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही बैठकीला उपस्थित
शिवाजी विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य डॉ.डी. यू. पवार, भैया माने, डॉ. उदय नारकर, प्राचार्य जी. पी. माळी, प्राचार्य आय. एच. पठाण, प्राचार्य जे. के. पवार, किसन कुराडे, रमेश पोवार, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, माजी मुख्याध्यापक विलास आंबोळे, सी. एम. गायकवाड, अनिल घाटगे, रणजीत शिंदे, मिलिंद भोसले, आनंद खामकर आदी उपस्थित होते.