फुटबॉल स्पर्धेत शिव स्पोर्ट्स, सोनटक्के तालीम विजयी
schedule29 May 23 person by visibility 370 categoryक्रीडा
के एस ए क गट साखळी फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या फुटबॉल मैदानावर के. एस. ए. क गट साखळी फुटबॉल स्पर्धेत शिव स्पोर्ट्स आणि सोनटक्के तालीम मंडळाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सोमवारी झालेल्या सामन्यात शिव स्पोर्ट्सने बागल चौक फुटबॉल क्लब चा ४-० असा पराभव केला. वैभव पाटीलने दोन तर स्वयंमसिंह पाटील ,नवनाथ साळोखे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात सोनटक्के तालीम मंडळाने श्री महागणपती ग्रुपचा टायब्रेकर मध्ये ५-४ गोलने पराभव केला. पूर्णवेळेत सामना शून्य गोल बरोबरीत होता. या स्पर्धेत एकूण 114 सामने खेळवले जाणार आहेत. या संघाची चार गटात विभागणी केली असून त्यातून वीस संघ निवडले जाणार आहेत. या वीस संघांमध्ये बाद पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत.