Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडेपुणे पदवीधरमध्ये  उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष !  महायुतीकडून स्मिता जाधव,  महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजाशिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधक

जाहिरात

 

शाहू गोल्ड कप, फुटबॉल अॅकॅडमीची मालोजीराजेंकडून घोषणा

schedule05 Dec 22 person by visibility 443 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
पुढील वर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धा आणि लहान मुलांसाठी फुटबॉल अकॅडमी सुरु करण्याची घोषणा वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि के. एस. ए. चे अध्यक्ष मालोजीराजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा लोगो अनावरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त पुढील वर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बाहेरच्या संघांनाही निमंत्रित केले जाणार आहे. स्थानिक 16 संघातून बेस्ट चार संघांबरोबर बाहेरच्या चार संघांबरोबर सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक चार संघांना शाहू गोल्ड कप साठी अन्य स्थानिक फुटबॉल संघातील चांगले खेळाडू घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने विश्व फुटबॉल स्पर्धेमध्ये भारताचे मानांकन उंचावण्यासाठी देशभर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याचे काम सुरू केले आहे त्यानुसार ग्रास रूट प्रोग्रॅम तयार करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ही लहान मुलांसाठी ट्रेनिंग अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे .तसेच प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांना पाचारण करण्यात येणार आहे.पंचांचा दर्जा सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे याचा प्रत्येक राज्याला भेट देत असून स्थानिक फुटबॉल साखळी स्पर्धेतील एक किंवा दोन सामने पाहण्यासाठी ते कोल्हापुरात येणार असल्याचेही मालोजीराजे यांनी सांगितले. पश्चिम बंगाल, केरळ ,गोव्यानंतर कोल्हापुरात फुटबॉलला लोकाश्रय मिळत असल्याची नोंद अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतली आहे. त्यानुसार संतोष ट्रॉफी फुटबॉल सामने सात जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.त्याचा लाभ स्थानिक संघ आणि खेळाडूंना होणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून कोल्हापूर महत्त्वाचे स्थान मिळणार असल्याने स्थानिक स्पर्धा आणि संघावर अन्याय होऊ नये म्हणून शाहू स्टेडियम व्यतिरिक्त अन्य चांगल्या मैदानावर सामने खेळण्याबाबत ही के एस ए चा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes