मंत्र्यांच्या आशीर्वादाने मार्केट यार्डात महापालिकेच्या रस्त्याची विक्री
schedule25 May 22 person by visibility 1024 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील महापालिकेच्या मालकीच्या रस्त्याची विक्री करण्यात आली आहे. एका मंत्र्यांच्या आशिर्वादाने रस्त्यावरती 13 चक्क केबिन उभारले आहेत. असा आरोप माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी परिषदेत केला. रस्ता महापालिकेचा, केबिनसाठी ठराव बाजार समितीचा. या सार्या प्रकारात आर्थिक उलाढाली झाल्या आहेत. एकूण 69 केबिन प्रस्तावित आहेत असेही ते म्हणाले. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आमचा विरोध नाही. पण अतिक्रमण हटावच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे. राजारामपुरीत राजकीय आकसापोटी सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या भिंती कंपाउंड वॉल पाडण्यात आले. अगोदर कारवाई केली आणि नंतर नोटिसा पाठवण्यात आल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांनी महापालिका विकत घेतल्याच्या अविर्भावात कामकाज सुरू केला आहे. राजारामपुरीमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या चुकीच्या कारवाया केले आहेत, त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिका प्रशासन कारवाईमध्ये दुटप्पी भूमिका घेत आहे. डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल व्यवस्थापनाने महापालिकेचा रस्ता अडवला .गेट बांधला, मात्र तेथे कारवाई होत नाही. दुसरीकडे राजकीय पक्षातून राजारामपुरीत कारवाई सुरू आहेत. या सगळया प्रकाराविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे असे कदम यांनी सांगितले. कसबा बावडा येथील एका व्यापारी संकुलाला गेली एकवीस वर्षे घरफाळा नाही. मंत्र्याशी निगडीत ही इमारत आहे. येत्या चार दिवसांमध्ये महापालिकेने कारवाई सुरू केली नाही तर त्या संकुलासमोर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या प्रकरणाचा पोल-खोल करू असा इशारा सुनील कदम यांनी दिला. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके उपस्थित होते