भारतीय मजदूर संघाच्या उपाध्यक्षपदी सचिन मेंगाळे
schedule04 Feb 25 person by visibility 119 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज कंत्राटी कामगार,संघटित व असंघटीत क्षेत्रात कार्यरत सचिन मेंगाळे यांची भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मेंगाळे हे भारतीय मजदूर संघात १९९७ पासून कार्यरत आहेत. भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मनोगत मेंगाळे यांनी व्यक्त केले आहे.
पुणे येथे एक व दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश बैठकीमध्ये प्रांत प्रभारी सी.वी.राजेश, प्रदेश अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगिर व संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी ही निवड घोषित केली.
आगामी काळ हा कंत्राटी कामगारांचाच आहे व अशा वेळी संघटित असंघटीत क्षेत्रात शोषित पीडित वंचित कांमगारांच्या हितार्थ सरकार व प्रशासनाविरोधात न्याया साठी सतत व प्रामाणिकपणे अथक संघर्ष करत असलेल्या सचिन मेंगाळे यांना भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा दुग्धशर्करा योग असल्याचे मत वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केले.