+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule02 Apr 24 person by visibility 437 categoryआरोग्य
खजानिसपदी डॉ. गुणाजी नलवडे यांची निवड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :येथील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ( जीपीए) २०२४ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण धुमाळे तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी जीपीएचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते उपस्थित होते. 
खजानिसपदी डॉ. गुणाजी नलवडे, प्रेसिडेंट ईलेक्ट डॉ. वर्षा पाटील, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश सातपुते, प्रेसिडेंट ॲडव्हायझरी डॉ. सचिन मुतालिक,सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ,डॉ. शुभांगी पार्टे, व सदस्य म्हणून डॉ. रमेश जाधव,डॉ. शिवाजी मगदूम यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यमध्ये डॉ. हरीश नांगरे,डॉ. राजेश सोनवणे, डॉ. दीपक पोवार,डॉ प्रशांत खुटाळे, डॉ. पूजा पाटील, डॉ. विलास महाजन,डॉ. शशिकांत पाटील,डॉ.किशोर निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी मावळते सचिव डॉ.हरीश नांगरे यांनी मागील वर्षाच्या सचिव अहवाल सादर केला व अध्यक्ष. डॉ. राजेश सातपुते यांनी संस्थेचा वर्षभरातील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. नवनिर्वाचित कार्यकरिणी सदस्यांची यादी सल्लागार समिती चेअरमन डॉ. रमेश जाधव यांनी जाहीर केली.नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी येणारे वर्षात होणाऱ्या कार्यक्रमाबद्दलचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरीश नांगरे यांनी केले व आभार डॉ. महादेव जोगदंडे यांनी मानले. यावेळी डॉ. उद्यम व्होरा, डॉ. शिवपुत्र हिरेमठ, डॉ.राजेश कुंभोजकर, डॉ.चंद्रकांत सोनवणे, डॉ. बिंदगे, डॉ. पी. पी. शहा, डॉ. शीतल पाटील, डॉ.शिवराज देसाईआणि जीपीए सदस्य उपस्थित होते.