+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !!
Screenshot_20240226_195247~2
schedule29 May 23 person by visibility 169 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने बालगोपाल तालीम मंडळाचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहे.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार चढाया केल्या. २६ व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात प्रॅक्टिसला यश आले. सागर चिलेच्या पासवर प्रणव कणसेने मैदानी गोल करत संघाला १-०अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राहिली.
उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी बालगोपालने सूत्रबद्ध चढाया केल्या. ४९ व्या मिनिटाला डी बाहेरून बालगोपालच्या जिबेलो याने वेगवान फटक्याद्वारे उत्कृष्ट गोल ऐ सामना १-१ असा बरोबरीत आणला. प्रॅक्टिस सागर चिले ची चढाई दुर्दैवाने वाया गेली. त्याचा हळूवार फटका गोलखांबाला लागून बाहेर गेला. ६६ व्या मिनिटाला राहुल पाटील च्या पासवर सागर चिलेने हेडद्वारे गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत परतफेड करण्यासाठी बालगोपालने धारदार चढाया केल्या. जिबेलोचा वेगवान फटका गोलखांबावरून गेला, तर त्याची एक चढाई प्रॅक्टिसच्या गोलरक्षकाने रोखली. एक गोलची आघाडी कायम टिकवत प्रॅक्टिसने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
प्रॅक्टिसकडून रोहित भोसले, ओम पवार, सागर चिले, राहुल पाटील ,सागर पवार ,शिवम पवार यांचा तर बालगोपालकडून जिबेलो, अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील, साहिल डाकवे, प्रसाद सरनाईक, सुरज जाधव यांचा चांगला खेळ झाला. प्रॅक्टिसच्या आदित्य पाटील याची सामनावीर तर बालगोपालच्या केल्विन याची लढवय्या खेळाडू निवड झाली.
 मंगळवारचा सामना 
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, दुपारी चार वाजता.