कोल्हापूरचा चित्रकारांचा रंगबहार ग्वाल्हेरमध्ये बहरणार, नोव्हेंबर महिन्यात आयोजन
schedule25 Sep 23 person by visibility 448 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या अभिजात चित्रकारांचे ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे कल्पतरू आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रो. वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम होत आहे. या प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रमोद कुमार जोशी यांनी रविवारी कोल्हापुरातील चित्रकारांची भेट घेऊन संवाद साधला.
कोल्हापूरच्या मातीशी आमची नाळ जुळली असून प्रो. वासंती जोशी हे अभिनेते कैलासवासी चंद्रकांत मांडरे यांच्याकडे कला संस्कृतीचे धडे घेतले. त्यांच्या नावे ग्वाल्हेरमध्ये कल्पतरू आर्ट गॅलरी सुरू करत आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरचा कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय कोल्हापुरातील चित्रकारांचे ग्वाल्हेर येथे २५ ते २६ नोव्हेंबर २०२३ अखेर चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. या चित्रकारांमध्ये चित्रकार प्राचार्य अजय दळवी. प्राचार्य राजेंद्र हंकारे ,प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, धीरज सुतार, सूर्यकांत निंबाळकर, संपत नायकवडी ,जगन्नाथ भोसले, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे बबन माने . मनोज सुतार ,श्रीरंग मोरे सुनील पंडित आदी चित्रकार आपले चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन सादर करणार आहेत. यांच्यासोबत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथील स्थानिक चित्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातील मंगलधाम कार्यालय येथे अभिनेते चंद्रकांत मांढरे आणि प्रो. वासंती जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाली. याप्रसंगी कोल्हापूरच्या कलावंताच्या वतीने प्रमोद कुमार जोशी यांचा समन्वयक प्रशांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी मस्के, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य राजेंद्र हंकारे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांनी अभिनेते चित्रकार चंद्रकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विजय टिपुगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी शाहीर राजू राऊत कोल्हापूर वस्तू संग्रहालयाचे पदाधिकारी उदय सुर्वे , उत्तम कांबळे. इतर मान्यवर कलावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन मैत्रेयी शुक्ल यांनी केले. दरम्यान ग्वाल्हेरमधील चित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे समन्वयक म्हणून चित्रकार प्रशांत जाधव आणि धीरज सुतार परिश्रम घेत आहेत.