Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभभुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदनगोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यातथेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीखाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवतवारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडप्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !! सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप

जाहिरात

 

आनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवार एकांकिका सादरीकरण

schedule19 May 25 person by visibility 384 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवारी, (२० मे २०२५ ) येथील शाहू स्मारक भवन येथे नेबर, पलंबर आणि ती, ऑलमोस्ट डेड आणि कलम ३७५ या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. नवोदित कलाकार मंडळी  आपली कला सादर करणार असून, प्रेक्षकांना दर्जेदार एकांकिकांचा आनंद घेता येणार आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून या एकांकिका सुरू होतील. दरम्यान पनवेल येथे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरच्या या तिन्ही एकांकिका सहभागी होत आहेत. आनंदयात्री फेसबुक समूह गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला चालना देत आहे. या समूहाचे उपक्रम प्रमुख प्रशांत काळे यांनी सांगितले की आमचा उद्देश मराठी नाट्य परंपरेला जपताना नव्या पिढीला रंगभूमीशी जोडणे हा आहे. ही स्पर्धा नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन प्रदान करेल. एकांकिक पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कोल्हापूर शहरातील व परिसरातील रसिकांनी या एकांकिकांचा जरूर आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या एकांकिका आयोजित करण्यासाठी उद्योजक श्रीकांत पोतनीस, गिरीश सामंत, शिरीष बंदरकर, संदीप गुळवणी यांच्यासह आनंदयात्रीच्या सदस्यांनी सहकार्य केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes