आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवर डॉ. बी. वाय. माळी
schedule12 Sep 23 person by visibility 344 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील रा. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. वाय. माळी यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी त्यांचे नामनिर्देशन केले होते.
डॉ. माळी हे रा. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक वैद्यकीय अधीक्षक, उपाधिष्ठाता, प्रभारी अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दहा शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विविध ४४ समितीवर अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष तर राज्याचे सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.