नामविस्तारासाठी सतरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
schedule14 Mar 25 person by visibility 155 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे नामविस्तार करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. दुपारी तीन वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारही सहभागी होणार आहेत. विविध संस्था, संघटनांचा सहभाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुनील घनवट, गजानन तोडकर, अभिजीत पाटील, प्रमोद पाटील, उदय भोसले, राजू यादव, अरुण गवळी, डॉ. मानसिंग शिंदे, शिवानंद स्वामी, राजू तोरस्कर आदींच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झाली. या मोर्चामध्ये नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.