Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

मालती पाटील किक्रेट अकॅडमी, |आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ब विजयी

schedule27 May 23 person by visibility 500 categoryक्रीडा

माजी आमदार दिनकरराव यादव चषक क्रिकेट स्पर्धा 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :­ राजाराम कॉलेजच्या मैदानावर कोल्हापुर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत व यादव बंधु (शिरोळ) पुरस्कॄत माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव चषक अ गट क्रिकेट स्पर्धेत मालती पाटील स्पोर्ट्स अकॅडमी आणि अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स अकॅडमी ब संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला.
  सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशन विरूध्द कै|मालती पाटील किक्रेट अकॅडमी यांचे मध्ये खेळवण्यात आला.या सामन्यात कै|मालती पाटील संघांने13 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना कै|मालती पाटील किक्रेट अकॅडमीने 40 षटकांत 8 बाद 226 धावा केल्या. यामध्ये अनिकेत नलवडेने 76, प्रतिक कदमने नाबाद 50, प्रथमेश बाजारीने 22, रोहीत माणगांवकर व करण सागांवकरने प्रत्येकी 19 व विराज म्हैत्रे 15 धावा केल्या|सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशन कडुन हर्षल बोससेने 3, मतीन शेखने 2, अभिजीत काटे व सौरभ कोटलगी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. उत्तरादाखल ख सागरमाळ स्पोर्टस्ने 40 षटकांत सर्वबाद 213 धावा केल्या| यामध्ये कौस्तुभ कोतोलीकर 74, अभिजीत काटे 41, प्रियतोष भोसले 34, हर्षल बोरसे 17 व रोहीत चौगुले 13 धावा केल्या| कै|मालती पाटील किक्रेट अकॅडमीकडून करण सागांवकरने 5, प्रतिक कदमने 2, तुषार पाटील व कपिल सागांवकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.  
दुसरा सामना शाहूपूरी जिमखाना येथे कै|आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस अकॅडमी ब विरूध्द शाहूपूरी जिमखाना यांचे मध्ये खेळविणात आला. या सामन्यात आण्णा मोगणे सहारा स्पोर्टसने 29 धावानी विजय मिळविला. प्रथम फलदांजी करताना |आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ब ने 20 षटकांत 7 बाद 130 धावा केल्या. यामध्ये आदित्य पाटील 47, अभिनंदन गायकवाड 21, सुरज जाधव 14, अभिषेक आंब्रे 11 व अथर्व शेटके 10 धावा केल्या. शाहूपूरी जिमखानाकडून अजित बागडी, मुद्दस्सर मुल्ला व विवेक बसर्गे यांनी प्रत्येकी 2 बळी. घेतले| उत्तरादाखल शाहूपूरी जिमखानाने 16.3 षटकांत सर्वबाद 101 धावा केल्या. यामध्ये अमर त्रिपाठी व अमित ढेंगे प्रत्येकी 21, तनय पुसाळकरने14, प्रतिक जमदाडेने 13 व अजित बागडीने 10 धावा केल्या.आण्णा मोगणे सहारा स कडुन प्रथमेश साठे व सार्इप्रसाद माने यांनी प्रत्येकी 3, अथर्व शेLकेने 2, वरद माळी व सुरज जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes