Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
परख –राष्ट्रीय सर्व्हेक्षणमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमशक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांनाशक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार आंदोलन, तीन तास राष्ट्रीय महामार्ग ठप्पस्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!

जाहिरात

 

जयसिंगपूरची आदिती बनली आयएएस, मेंढपाळाचा मुलगा आयपीएस ! प्रीआयएएस सेंटरचेही यश !!

schedule22 Apr 25 person by visibility 830 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले (६० वी रँक),  कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे (५५१ वी  रँक), तर करवीर तालुक्यातील हेमराज हिंदुराव पनोरेकर (९२२ वी रँक) यश मिळवले. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या विद्या प्रबोधिनीच्या शिष्यवृत्ती योजनेतंर्गत सहाय्य लाभलेले १८ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूरच्या तरुण, तरुणींनी लख्ख यश मिळवले आहे.  जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले यांनी ६० वी रँक घेऊन  यश मिळवले. तिला आयएएस व्हायचे आहे. यापूर्वी २०२३ मधील परीक्षेत ४३३ वा रँक मिळवला होता. इंडियन डिफेन्स अकौंट सर्व्हिसमध्ये रुजू झाल्या होत्या. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आदितीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालू हायस्कूल जयसिंगपूर येथे झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण जनतारा ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर येथे झाले. दत्त साखर कारखान्याच चीफ इंजिनीअर संजय चौगले यांच्या त्या कन्या आहेत.

कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे या तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५५१ व्या रँकने उत्तीर्ण झाला. बिरदेवचे वडील मेंढपाळ आहत. बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी बनणार आहे. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर येथे झाले. माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे तर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण शिवराज विद्यालय मुरगुड येथे झाले.त्याने पुण्यातींल सीओईपी येथून इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. बिरदेव हा पहिल्यापासून हुशार विद्यार्थी म्हणून गणला आहे. दहावी व बारावी परीक्षेत तो, मुरगूड केंद्रात प्रथम आला होता.  

……………………….

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील तिघे उत्तीर्ण

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर (प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटर) येथील तीन विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत यश मिळवले. यामध्ये ऋषीकेश वीर (५५६), रोहन पिंगळे (५८१ रँक) मिळवत यशाला गवसणी घातली. बिरदेव ढोणे सुद्धा या सेंटरचा विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. याबद्दलची मााहिती डॉ. लता जाधव यांनी  दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes