महाशिवरात्रीनिमित्त गोकुळची दूध विक्री साडेसतरा लाखावर, मंदिरात भाविकांना मोफत दूध वाटप
schedule26 Feb 25 person by visibility 144 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त मागील वर्षाच्या तुलनेत एक लाख चार हजार लिटर दूध विक्रीची वाढ झाली आहे. एकूण दूध विक्री १७ लाख ५४ हजार लिटर इतकी झाली. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी गोकुळतर्फे मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संघाचे संचालक शशिकांत पाटील (चुयेकर )संभाजी पाटील यांच्या हस्ते दूध वाटप झाले. तसेच गोकुळची बासुंदी सवलतीच्या दरात देण्यात आली. यामध्ये कसबीड येथील महादेव मंदिरामध्ये जेष्ठ संचालक विश्वास पाटील, वडणगे येथे संचालक बाबासाहेब चौगुले, उत्तरेश्वर पेठ येथे संचालक चेतन नरके, कणेरी मठ येथे संचालक प्रकाश पाटील, चंदगड पाटणे फाटा येथे संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले.
उत्तरेश्वर मंदिर-उत्तरेश्वर पेठ,कोल्हापूर, स्वयंभू महादेव मंदिर घोटवडे, महादेव मंदिर- वडणगे, तसेच करनूर,कोगनोळी,नेसरी, कवठेसार, सांगली आलेरत्नेश्वर मंदिर –कराड, कपिलेश्वर मंदिर –बेळगाव, ओंकारेश्वर मंदिर –पुणे, व्हटेश्वर मंदिर –आळंदी येथील मंदिरामध्ये गोकुळ मार्फत दूध वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे संचालक संभाजी पाटील , सहायक महाव्यवस्थापक (मार्केटिंग) जगदीश पाटील, मार्केटिंग प्रमुख हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे उपस्थित होते .