कोल्हापुरात पाच दिवसीय महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन
schedule18 Mar 25 person by visibility 116 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २० ते २४ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन केले आहे. ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे हा उपक्रम होत आहे. 'महाराष्ट्र व्यापारी पेठ' हा आमचा मराठी उद्योजक, लघु उद्योजकांसाठी विशेषत: महिला उद्योजकांसाठीचा एक विशेष उपक्रम आहे. याद्वारे कोल्हापूर मधील लघुउद्योजक, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. अशी माहिती मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी दिली आहे.