केआयटीमध्ये अभियंता दिन साजरा
schedule23 Sep 23 person by visibility 275 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयातर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. एजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक अरविंद देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी देशपांडे यांनी, भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून प्रत्येक अभियंत्याने नक्की प्रेरणा घेतली पाहिजे अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कामातील प्रामाणिकपणा, सूक्ष्म नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह,त्याचबरोबर सृजनशीलता, स्वदेशी तंत्रज्ञान, उद्योजकता, रोजगार निर्मिती या सर्व गोष्टींच्या बाबतीत विश्वेश्वरय्या कसे आग्रही होते हे त्यांनी काही प्रसंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडले.संस्थेचे रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. जितेंद्र भाट यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अश्विनी शिंदे यांनी करून दिला. श्वेता बंकापुरेने आभार मानले. प्रा.अरुण देसाई, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.