आयुष्यात कला जोपासा - पंडित विनोद डिग्रजकर
schedule15 Mar 25 person by visibility 151 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नोकरी व्यवसाय करतानाही एक कला जोपासा . कारण नोकरी व्यवसाय जगण्यासाठी असतो पण कशासाठी जगायच हे कला शिकवते, असे प्रतिपादन शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांनी केले. टी. के. वडणगेकर यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त 'गुरू-शिष्य' कला प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित या प्रदर्शनास निवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, कला दिग्दर्शक दिलीप रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार छायाचित्रकार सुदर्शन वंडकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कला दिग्दर्शक दिलीप रोकडे यांनी छावा चित्रपटासाठी केलेल्या कामाचे अनुभव कथन केले. ते म्हणाले, हा सत्कार मला माहेरचा वाटतो. मी कोल्हापूरचा आहे दळवीज, कला निकेतन मध्ये शिकलो. अंबाबाई मंदिरात स्केचिंग केली कोल्हापूरने ऊर्जा दिली आहे
विवेक आगवणे म्हणाले, कलेचा आनंद हा अल्टिमेट असतो . त्यामुळे कोण काय म्हणते हे न बघता काम करत राहा . आज स्पर्धेचा काळ आहे , यात हरवून जाऊ नका . हिशोबी , व्यवहारी होऊ नका. आपल्या कला निर्मितीचा आनंद घ्या.
अभिजीत कांबळे यांनी स्वागत केले. प्राचार्य प्राचार्य अजेय दळवी यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय विजय टिपुगडे यांनी करून दिला.बबन माने यांनी आभार मानले. प्राचार्य मनोज दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उदय कुंभार यांचीही उपस्थिती होती.कला प्रदर्शनात विजय टिपुगडे, अजेय दळवी, विलास बकरे,विद्या बकरे, शिवाजी मस्के, मनोज दरेकर, संतोष पोवार, नागेश हंकारे, बबन माने, अभिजित कांबळे, प्रवीण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, शैलेश राऊत, किशोर राठोड, प्रकाश मोहिते,राहुल रेपे, पुनम राऊत, सर्वेश देवरुखकर, विजय उपाध्ये, आरिफ तांबोळी, नवज्योत काळे, विवेक कवाळे, पुष्कराज मेस्त्री, शुभम कुंभार, सुदर्शन वंडकर,केदार पोवार यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शन २१ मार्च पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.