Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवालशिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रकप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शनमहिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकरअवनितर्फे शुक्रवारी शिक्षण हक्क  परिषद

जाहिरात

 

काँग्रेस फक्त आश्वासन देते, पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

schedule08 Nov 24 person by visibility 74 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. राजभरातील महिला महायुती सोबत आहेत. यामुळे अस्वस्थ होऊन काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची जी घोषणा केली आहे ती पूर्ण करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. कारण काँग्रेस फक्त आश्वासन देते, योजनांची पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगावला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. कोल्हापुरात सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या खुंटलेल्या विकासाला काँग्रेसच्या नेतृत्वाला जबाबदार धरले. कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या भाजप व महायुतीकडे असायला हवे. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या कोल्हापूरच्या विकासाला शतपटीने गती मिळेल. महायुती सरकारने राज्यातील लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत. युवाशक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण, महिला कल्याण या सूत्रावर सरकार काम करत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत. निवडणुकीनंतर त्यामध्ये वाढ होऊन दर महिन्याला 2100 रुपये जमा होतील. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आहे. ते आता महिन्याला तीन हजार रुपये देणार असे म्हणत आहेत. मात्र काँग्रेस केवळ आश्वासन देते. त्याची पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही.
येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या हाती सत्ता देईल असा विश्वास ही सावंत यांनी व्यक्त केला. तसेच 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपला मतदारांनी कौल दिला होता. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ खुर्चीसाठी लोकांचा कौल डावलला. भाजपशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला खोडा घातला. असे टीकास्त्र सावंत यांनी सोडले.
 पत्रकार परिषदेला कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ. आनंद गुरव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes