Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

निधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना !

schedule22 May 24 person by visibility 479 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विविध विकास योजना वेळेत पूर्ण करा, प्राप्त निधी अखर्चित राहू नये.यासंबंधी काळजी घ्या’अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केल्या. 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी, २१ मे रोजी झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने धोरणात्मक निर्णय हे पुढील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात यावे असे सूचित केले. दरम्यान जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईवर उपाय योजताना चारा निर्मितीसाठी एक कोटी रुपयांच्या योजनेला सभेत मंजुरी देण्यात आली. चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी, दूध उत्पादकांना मोफत चारा बियाणे वाटप केले जाणार आहे. 
प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांच्यासह विभागप्रमुख, गटविकास अधिकारी सभेला उपस्थित होते.या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. 
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४ अंतर्गत जिल्हा परिषदेचा प्रस्तावास शिफारस देण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०२४-२५ दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) योजनेस मान्यता देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes