हनुमाननगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत
schedule16 Sep 23 person by visibility 343 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हनुमाननगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. डॉ. शिवाजीराव हिलगे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचाही सत्कार झाला.
संघाचे सचिव बाळासाहेब साळोखे यांनी अध्यक्षांचे मनोगत वाचून दाखविले. संघाचे कोषाध्यक्ष प्रकाश देसाई अहवाल वाचन केले. सभेत विषयपत्रिकेवरील ताळेबंद व अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. संचालक शरद कारखानीस यांनी मार्गदर्शन केले. संचालक प्रकाश हळबे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळया माध्यमातून संघाच्या कामकाजाला हातभार लावावा व संस्थेची प्रगती साधावी. तसेच संघाकडील उपलब्ध पुस्तकांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सभेला शामराव पाटील, भूपाल देसाई, रमेश निपाणीकर, शंकरराव माने, दशरथ चौगुले, शिवाजीराव पवार, दत्तात्रय कुलकर्णी, उर्मिला भोसले, प्रसन्न कोळेकर, श्रीकृष्ण वाघ, डॉ. रामराव पाटील, संभाजीराव भोसले व सेवक दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.