पोलिसांची जबरदस्त कामगिरी ! चोरीत गमावलेले एक किलो सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत
schedule25 Mar 23 person by visibility 528 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हयात चोरांनी लांबवलेले सोन्याचे दागिने चोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडे विविध गुन्ह्यात जप्त केलेले एक किलो सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत देण्यात आले. गमावलेले दागिने परत मिळाल्यानंतर मुळ मालकांनी कोल्हापूर पोलिसांचे अभिनंदन केले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत चोरीस गेलेले दागिने आज शनिवारी एका छोट्या कार्यक्रमात परत देण्यात आले.
कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोरी आणि दरोड्याच कसून तपास करुन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्याकडून अंदाजे एक किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते. हे दागिने मुळ मालकांना आज समारंभपूर्वक वरिष्ठ अधिकार्यांच्या हस्ते परत करण्यात आले. या उपक्रमामुळं कोल्हापूर पोलिस दलानं संबंधित व्यक्तींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घरफोडी, दरोडा , चेन स्नॅचिंग, तर दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्यानं सोनं लंपास करणे, सीआयडी आहे भासवून दागिने लंपास करणे या गुन्ह्याचा कोल्हापूर पोलिसांनी यशस्वी तपास केला. वेगवेगळया १५ गुन्हयातील चोरीला गेलेल्या ५४ लाख ४५ हजार रूपये किंमतीचं सुमारे १ किलो सोन्याचे दागिने मुळ मालकांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते परत करण्यात आले.