दोन लाखाची लाच स्वीकारताना विनायक औंधकर पोलिसांच्या जाळ्यात
schedule16 May 23 person by visibility 1685 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (१६ मे) कारवाई केली. बांधकाम परवानासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. औंधकर यांची तीन महिन्यापूर्वी विटा येथे बदली झाली होती. त्यापूर्वी ते कोल्हापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
विटा येथील एका इमारतीच्या बांधकाम परवानासाठी औंधकर यांनी अडीच लाखांची मागणी केली होती. त्यापैकी संबंधित इमारतीच्या ठेकेदाराने लासलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. इमारतीच्या ठेकेदाराकडून अडीच लाखापैकी दोन लाख रुपये स्वीकारताना औंधकर यांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. औंधकर यांची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे.