कोल्हापुरात होणार देशभरातील न्यूरो सर्जनांची तीन दिवसीय परिषद
schedule11 Feb 25 person by visibility 163 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "परिवर्तनशील प्रतिमान, उदयोन्मुख ट्रेंड आणि अमर्यादित विस्तार..." या उद्देशास अनुसरुन कोल्हापूर येथील न्यूरोसर्जन समितीने राष्ट्रीय स्तरावरील मेंदूविकार शस्त्रक्रियातज्ञांची परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे होणार आहे. या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटकसह देशातील विविध भागातून परदेशातून सुमारे प्रसिद्ध ३०० न्युरोसर्जन सहभागी होणार आहे.शी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. एन.वाय जोशी आणि सचिव डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
परिषदेत मेंदुविकारासंबंधी विशेष वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यक्रम सादर केले जातील. व्याख्याने, परिसंवाद, प्रयोगशाळेतील शवविच्छेदन, व्हिडिओ, आव्हानात्मक केसेस, पोस्टर सादरीकरण आणि माहितीपर मार्गदर्शन यांचा समावेश असलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. पन्नासहून अधिक स्टॉल्स येथे उभारण्यात येणार आहेत.या परिषदेत दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ६ विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. मेंदूच्या विविध शास्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीत या परिषदेचे औपचारिक उद्घाटन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक १६ फेब्रुवारी दुपारी २ वाजता या परिषदेचा समारोप होणार आहे. पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य एमसीएनएस (मिड वेस्ट चाप्टर ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन ) संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहिदास, खजानिस मन्सूरअली सिताब खान, कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. उदय घाटे, न्यूरोसर्जन निलेश बाकळे, न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध मोहिते उपस्थित होते.