Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभभुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदनगोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यातथेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीखाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवतवारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडप्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !! सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप

जाहिरात

 

 लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!

schedule07 May 25 person by visibility 401 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लेखकाचा खडतर प्रवास ‘पायवाटाची सावली’ या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २३ मे २०२५ पासून प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार, तंत्रज्ञांची टीम कोल्हापुरात आली होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सिनेमा वेगळया धाटणीचा आहे. लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यातील पडवळवाडी परिसरात झाले आहे. या सिनेमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभाग आहे.

'मीना शमीम फिल्म्स' प्रस्तुत 'पायवाटाची सावली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू 'मीना शमीम फिल्म्स'ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आणि सिंडीकेशनचे काम केले आहे. सिनेमात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. यामध्ये कोल्हापूरचे कलाकार संजय टिपुगडे  यांची भूमिका आहे. तर अमर मठपती यांनी निर्मिती व्यवस्थापनाची बाजू सांभाळली आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक - लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्याविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल. करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहावा.”

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes