पाच हजाराची लाच घेताना लघुपाटबंधारे खात्याचा कर्मचारी जाळ्यात
schedule17 Apr 23 person by visibility 624 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शेतीसाठी पाणी उपसा परवाना देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना चंदगड लघु पाटबंधारे खात्यातील कर्मचारी
सागर गुणवंत गोळे,( वय ३६ मोजणीदार, वर्ग 3, चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्र. १, चंदगड, ता. चंदगड) याला पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी 17 रोजी चंदगड येथे करण्यात आली .
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. चंदगड तालुक्यातील एका तक्रारदाराने ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी रीतसर पाणी उपसा परवाना मिळणेसाठी चंदगड लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे पाणी उपसा करणेसाठी परवानगी देणेसाठी चंदगड लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी गोळे याने साडेआठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यापैकी तक्रारदाराने तीन हजार रुपयाची लाच कर्मचारी गोळे याला दिली. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड लघुपाटबंधारे विभागाचा कर्मचारी गोळे याला रंगेहात पकडले. प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पोना सुधीर पाटील, पोना सचिन पाटील, पोकॉ मयूर देसाई, चापोहेकॉ विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला