
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्वतंत्र मजदूर युनियन कोल्हापूर विभागातर्फे रविवारी 18 सप्टेंबर रोजी महिला परिषद आयोजित केले आहे. संघटित व असंघटित क्षेत्रातील महिला कामगार कर्मचारी व अधिकारी यांची परिषद होत आहे अशी माहिती युनियनच्या जिल्हाध्यक्षा शिवलीला अशोक हिरेमठ, उपाध्यक्षा साधना बनगे, सचिव स्वप्नगंधा मौर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महावीर कॉलेज समोरील बाबासाहेब कसबेकर सांस्कृतिक हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत महिला परिषद होणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे या उद्घाटक आहेत तर स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे एस पाटील न्यू कॉलेज येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर प्रमुख वक्ते आहेत. याशिवाय डॉ.रेश्मा पवार या महिलांचे आरोग्य, समस्या व उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला प्राजक्ता कुरणे, प्रेमानंद मौर्य उपस्थित होते.