+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule30 Mar 24 person by visibility 286 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 सकाळी साडेसात- आठ वाजता न्यू पॅलेसमधून बाहेर पडायचे. मोटारीतून प्रवास. अखंडपणे. कधी गडहिंग्लजचा दौरा करायचा. कधी चंदगड - भुदरगड तालुक्यातील डोंगराळी भागात पोहोचायचे. सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास मतदारांशी संवाद साधायला सुरुवात करायची. रोज नवा परिसर. प्रचार मेळावा संपला की थेट नागरिकांत मिसळायचे, युवकांच्या आशा-आकांक्षा जाणून घ्यायच्या. सर्वसामान्यांना दिलासा देत नवा आशावाद जागवायचा. शाहू छत्रपतींचा हा प्रचार फंडा ग्रामीण भागात लोकांच्या पसंतीस उतरला आहे.माझी उमेदवारी ही रयतेची आहे. जनतेसाठी मी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहे त्यामुळे मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे अशी साद शाहू महाराज हीच ठिकाणी होणाऱ्या संवाद यात्रेत घालत आहेत.
गेल्या आठवडाभरात शाहू छत्रपतींनी गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या भागाचा दोनदा दौरा केला. कोल्हापूर जिल्हयातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या तिल्लारीनगरपर्यंत प्रवास केला. अडकूर, बुजवडे, चंदगड, हेरे, नादवडे, पाटणेफाटा, देवरवाडी, शिनोळी, तुडये, माणगाव, कुदनूर, कोवाड येथे संवाद दौरा केला.
प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून होणारे उत्स्फूर्त स्वागत, कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार यामुळे या निवडणुकीत शाहू छत्रपतींची उमेदवारी
लोकांनी उचलून धरल्याचे स्पष्ट होत होते. शुक्रवारी, तुडये येथे दुपारच्या सुमारास संवाद दौरा झाला. नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.स्थानिक बाजारपेठ, रताळी, काजूला पडलेले भाव यासंबंधी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा घडविली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. ‘सगळे मिळून प्रयत्न करू या, प्रश्नांची सोडवणूक होईल. काजूला हमीभाव मिळावा म्हणून प्रयत्नशील राहीन. बेळगाव-चंदगड- सावंतवाडी
रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करेन’ हे त्यांचे शब्द उपस्थितांची उमेद वाढविणारे ठरतात.
………………….
भाजीपाला उत्पादकांशी संवाद, शेतकऱ्यांशी भेट
तुडये येथील संवाद दौरा संपला. शाहू छत्रपती व्यासपीठावरुन खाली उतरले. रस्त्याच्या एका बाजूला भाजीपाला उत्पादक-शेतकरी थांबलेले.
छत्रपतींनी त्यांची भेट घेतली. शेती उत्पादन, दर यासंबंधी चर्चा केली. शाहू छत्रपतींच्या या भेटीने भाजीपाला उत्पादक शेतकरी हरखून गेले.
या संवाद दौऱ्यात चंदगड तालुक्यातील बसरगेहून माणगावकडे प्रवास सुरू होता. रस्त्यालगत असलेल्या शेतीमध्ये पुरुष व महिला शेतकरी
मशागतीची कामे करत होती. शाहू छत्रपती मोटारीत असल्याचे दिसताच अनेकांनी नमस्कार केला. मोटारीकडे धाव घेतली. चटकन शाहू
छत्रपती हे मोटारीतून उतरले. शेतात पोहोचले. शेतकऱ्यांच्यासोबत शेतपिकासंबंधी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुंडलिक
व्हनगेकर, लक्ष्मण कांबळे यांनी शाहू छत्रपतींचे अभिनंदन केले. आमचं मतदान तुम्हालाच असे ठासून सांगितले.गेल्या पाच वर्षात खासदार
एकदाही फिरकले नाहीत अशा शब्दांत विद्यमान लोकप्रतिनिधीविषयी नाराजीही व्यक्त केली.
…………………
महाविकास आघाडीचे पदाधिकारी सक्रिय….
दोन दिवसाच्या चंदगड दौऱ्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सगळे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते एकसंधपणे कार्यरत होते.
काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, रामराज कुपेकर, अमर चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख अंकुश दळवी,
गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण,  विलास पाटील, मल्लीकार्जुन मुगेरी, प्रा. किसन कुराडे, बळीराजा संघटनेचे नितीन जाधव, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दल सेक्युलरचे तालुकाध्यक्ष बाळासो नाईक, सागर पाटील, बाळकृष्ण परीट, शशिकांत चौथे, पैलवान विष्णू जोशीलकर, डाव्या चळवळीचे सुभाष जाधव आदीचा सहभाग होता. सतेज टीममधील सचिन घोरपडे, विद्याधर गुरंबे, जे. के. पाटील, दगडू भोसले दौरा यशस्वी होण्यासाठी सक्रिय राहिले.