जिपच्या महिला पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस
schedule26 Oct 23 person by visibility 745 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाही दसऱ्यानिमित्त ललित पंचमीच्या दिवशी महिलांची शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये कामकाजी महिला आणि इतर महिला समूह अशा दोन गटांमध्ये महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या २२ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला पथकाला दहा हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक घोषित झाले आहे. दरम्यान या शोभायात्रेकरिता पारंपारिक वेशभूषेमध्ये आपल्या दुचाकीसह सहभागी व्हायचे होते याकरता तसेच प्रत्येक ग्रुपने एका संकल्पने च्या आधारे शोभायात्रेत सहभाग नोंदवायचा होता जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेवर आपल्या दुचाकी सजवल्या होत्या सर्व दुचाकीनवर बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेचे छायाचित्र दर्शनी भागात लावण्यात आले होते तसेच प्रत्येक दुचाकी फुले पाने अशा पर्यावरण पूरक साहित्य वापरून सजविण्यात आली होती.
सर्व सहभागी महिलांनी पिवळा कुर्ता सलवार व निळे जॅकेट कोल्हापुरी चप्पल आणि गुलाबी फेटा असा पारंपारिक कोल्हापुरी पेहराव केला होता.
या स्पर्धेचे पुरस्कार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहिर केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला पथकाला दहा हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक घोषित झाले आहे.
या शोभायात्रेत श्रीमती सुषमा देसाई, श्रीमती मनीषा देसाई, श्रीमती शिल्पा पाटील, श्रीमती माधुरी परीट, श्रीमती मीना शेंडकर आणि श्रीमती अरुणा हसबे या महिला अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या या महिला ग्रुपचे अभिनंदन केले आहे