Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
किकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणीशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई कराअखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मान

जाहिरात

 

व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सायबरमध्ये कोव्हिड सेंटर, १५० रुग्णांची सोय होणार

schedule18 Aug 20 person by visibility 391 categoryसामाजिक


महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेडची उपलब्धता होणे दुर्लभ झाले आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टमार्फत १५० रुग्णांच्या कोव्हिड सेंटरची सुरुवात होत आहे.

सायबर येथे हे कोव्हिड सेंटर आहे. बुधवारपासून (ता. १९) हे कोव्हिड सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. बुधवारी, दुपारी १२.३० वाजता या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन होणार आहे. खासदार संजय मंडलिक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार गोपिचंद पडळकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 या कोव्हिड सेंटरसाठी कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले आहे. तरी गरजू रुग्णांनी ९७६५९५०९०९ या हेल्पलाइन क्रमांकावर गुरुवार, ता. २० ऑगस्टपासून संपर्क साधवा असे आवाहन व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी फत्तेसिंगराव घोरपडे यांनी केले आहे.

……………..


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes