Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्मचाऱ्यांच्या कष्टाची संस्थेला जाणीव

schedule29 Nov 20 person by visibility 706 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करुन ‘गोकुळ’ला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी सेवेतून निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटते. तथापि संघाच्या नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यावर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव ‘गोकुळ’ नेहमीच ठेवेल.’असे प्रतिपादन संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले. 

‘गोकुळ’मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम झाला. ३२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नरके म्हणाले, ‘ या कर्मचाऱ्यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाची कामे केली. आज कर्मचाऱ्यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ परिवारासाठी द्यावा.’

याप्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई,रामराजे कुपेकर-देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम.पाटील, प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील आदी उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes