Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!

जाहिरात

 

नगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणार

schedule23 Jan 26 person by visibility 388 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले.सगळया पक्षांनी ताकतीने निवडणूक ल ढविली.  पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या. राज्यस्तरावरील नेते प्रचारात उतरले. दरम्यान आता पदाधिकारी निवडीपासून गटनेता निवडीपर्यंत सगळया गोष्टींची मान्यता आता प्रदेश पातळीवरुन होणार असे चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांच्या पसंतीद्वारे गटनेता निवडण्याचे ठरविले. नगरसेवकांकडून बंद पाकिटात गटनेत्याचे नाव घेऊन ते प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. आणि गटनेत्याची निवडही मुंबईतून प्रदेश कार्यालयातून होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता या महत्त्वपूर्ण पदाच्या अनुषंगााने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नूतन नगरसेवकांची बैठक झाली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिणीस विराज चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रास्ताविकात बैठकीची रूपरेषा सांगितली. 
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहणे, आपल्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील समस्या सोडवणे सर्वांशी एक दिलाने वागून पक्ष विस्तार, पक्षाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. यानंतर गटनेता निवडी प्रक्रिया संदर्भात सर्व भाजपा नगरसेवकांनी कोऱ्या लिफाफ्यामधून गटनेता म्हणून आपली पसंती लिहून पाकिटात नाव दिले. हे लिफाफे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यानंतर मुंबई प्रदेशातूनच गटनेता नियुक्तीची घोषणा होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes