बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाई
schedule25 Aug 26 person by visibility 115 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : बेकादेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भात करणाऱ्या एसटी यांच्या अकरा जणांच्या विरोधात कोल्हापुरात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या टोळीचे विरोधात मोक्का अंतर्गत झालेली ही राज्यातील पहिलीच कारवाई मानली जाते
मोक्का कारवाईतील आरोपींची नावे स्वप्निल केरबा पाटील (वय ३५, रा. जयभवानी तरुण मंडळाजवळ बालिंगा, महेश सुबराव पाटील (वय ३५ वर्षे व्यवसाय शेती रा. सिरसे ता. राधानगरी), श्रीमंत तानाजी पाटील (वय ३७ वर्षे व्यवसाय पोल्ट्री रा. परिते ता. करवीर ), विजय लक्ष्मण कोळसकर (वय ३९, रा. मडीलगे खुर्द ता. भुदरगड ), प्रशांत वसंत जाधव (रा. सीबीबी ४२५ वैभवनगर, जि. बेळगांव राज्य कर्नाटक), दत्तात्रय कृष्णात पाटील (सिरसे ता. राधानगरी), ओंकार गोरखनाथ कराळे (वय ३०, रा. सडोली खालसा ता करवीर), सुनिल प्रकाश पाटील (वय ३८, रा. सिरसे ता. राधानगरी), अनिल प्रकाश टिपुगडे (वय ४०, रा. भोगावती साखर कारखाना कॉलनी, ब्लॉक नंबर ५, खोली नंबर ४ भोगावती), शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील वय ४० रा. १६/७६१ शिवगंगा अपार्टमेंट आय जी एम हॉस्पीटल जवळ इचलकरंजी), अश्विनी गजानन शिंदे (वय ३८, रा. कसबा वाळवे ) अशी आहेत. करवीर पोलीस ठाणे हद्दीत कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वैद्यकीय तालुका अधिकारी पथकाने भोगावती सहकारी साखर कारखाना, शाहूनगर परिते येथील ब्लॉक नं ५ रुम नं ४ येथे सापळा रचून संबंधितावर गुन्हा करताना कारवाई करण्यात आली. दरम्यान या टोळीविरुद्ध मागील १० वर्षाच्या कालावधीतत करवीर पोलीस ठाणेस ०७ गुन्हे, जुना राजवाडा पोलीस ठाणेस ०१ गुन्हा, राधानगरी पोलीस ठाणेस ०२ गुन्हे, भुदरगड पोलीस ठाणे ०१ गुन्हा असे बेकायदेशिर गर्भलिंग तपासणी, गर्भपात बोगस डॉक्टर अशाप्रकारचे एकूण ११ गुन्हे केलेले आहेत.
गुन्ह्यातील आरोपींकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शिक्षण नसताना जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते. याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दखल घेत करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात अशाच प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केले आहेत. तसेच ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गर्भलिंग निदान व गर्भपाताचे गुन्हे करत असलेचे दिसुन येत होते. आरोपीत हे प्रामुख्याने गर्भवती महिलांना आकर्षित करणे, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक मिळविणे, त्याकरीता बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशिन खरेदी करणे, गर्भलिंग तपासणीसाठी जागा शोधणे बहुतांश वेळा पेशंटचे घरी जावुन गर्भलिंग तपासणी करणे, गर्भलिंगाची माहीती गर्भवती महिलेला देवुन स्त्रीभुण असल्यास बेकायदेशीरपणे गर्भपाताची व्यवस्था करणे अशी या टोळीची कार्यपद्धती होती.
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला.कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रस्तावाची छानणी करुन सदरचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा , यांच्याकडे सादर केला. त्यांनी टोळीची गुन्हे पार्श्वभुमी व कायदेशीर निकष यांची छाननी करून सदर टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश काढले.