बाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !
schedule26 Aug 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी शुक्रवारी, २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. विद्यमान सभापती नानासो कांबळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. तर उपसभापती राजाराम चव्हाण यांचे निधन झाले आहे. यामुळे सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकारी संस्था कार्यालयातील सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता बाजार समिती सभागृहात या निवडी होणार आहेत. विद्यमान सभापती कांबळे यांनी ११ ऑगस्ट रोजी सभापतिपदाचाा राजीनामा दिला आहे. बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ता आहे. सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कोटयातून सभापतिपदाची कोणाची निवड होणार याकडे लक्ष आहे. सभापतिपदासाठी संचालक प्रा. शेखर देसाई, संचालिका मेघा राजेंद्र देसाई यांची नावे चर्चेत आहेत. तर उपसभापतिपदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडून आलेले संचालक पांडूरंग काशीद व शिवसेनेचे संचालक संदीप वराडेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. बाजार समितीत सतेत सारे पक्ष एकत्र असले तरी संचालक मंडळात राजकारण आहे. गेल्या काही महिन्यापासून संचालक मंडळातील धुसफूस वाढली आहे. संचालक मंडळातील काही जण कुरघोडीचे राजकारण आहेत.