Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!

जाहिरात

 

कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचा

schedule24 Jan 26 person by visibility 340 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकांच्या ज्ञानात ‍वृध्दी, नव्या अध्यापन पध्दतीचा अभ्यास व अनुभवांची देवाण घेवाण या उद्देशाने कोल्हापुरातील  क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्यावतीने शिक्षकांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. पुणे जिल्ह्यातील  जालिंदरनगर, वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये  दोन दिवशीय अभ्यास दौरा पार पडला. या अभ्यास दौऱ्यात सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. गणपती कमळकर, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, प्रा. सी. एम. गायकवाड यांच्यासह पन्नासपेक्षा अधिक प्राथमिक -माध्यमिक शिक्षकांनी सहभाग घेतला.

साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या मार्गदर्शनानुसार या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने ‘टी फोर एज्युकेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’ स्पर्धेत जागतिक स्तरावर प्रथम स्थान पटकावले आहे. एका उजाड माळरानावर बंद होण्याच्या वाटेवर असलेली शाळा दत्तात्रय वारे या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले. या दौऱ्यात  क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या शिक्षकांनी  दत्तात्रय वारे गुरूजी यांच्याबरोबर संवाद साधला.

यावेळी दत्तात्रय वारे  म्हणाले, ‘शाळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळविणे हा शाळेचा हेतू नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अथवा खाजगी शाळांच्या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे आहोत हे यानिमित्ताने पाहता आले. जागतिक दर्जाच्या शाळा व जागतिक दर्जाचे शिक्षण सरकारी शाळेत उपलब्ध आहे हे दाखवून दिले. सरकारी शाळा टिकवायच्या असतील तर लोकसहभाग गरजेचा आहे. केवळ भौतिक सुविधांमध्ये न अडकता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तब्बल १५ अनोखे शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विदयार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात जीवनोपयोगी कौशल्ये निर्माण करणे गरजेचे आहे. ’

 यानंतर विदयार्थ्याना इतिहासाचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान देता यावे, या उद्देशाने पुणे येथील ऐतिहासिक आगाखान पॅलेस येथे शैक्षणिक  भेट दिली आणि स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांची माहिती घेतली. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्याशी असलेले मार्गदर्शकांनी ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. संग्रहालयातील छायाचित्रे, दस्तऐवज व वास्तुशैली यांचा अभ्यास करुन शिक्षकांनी अध्यापनात प्रत्यक्ष उदाहणांचा वापर कसा करता येईल यावर चर्चा केली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes