Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीट

schedule06 Jul 26 person by visibility 200 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीट यांची निवड करण्यात आली. परीट हे चंदगड तालुक्यातील आहेत. सहकारी संस्थांच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक सोमवारी (सहा जुलै २०२६) झाली. या बैठकीत परीट यांची निवड सर्वानुमते झाली.

अध्यक्षपदासाठी परीट यांचा एकमेव अर्ज होता. अध्यक्षपदासाठी परीट यांच्या नावाला संचालक अमर वरुटे हे सूचक तर संचालक गौतम वर्धन यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना परीट म्हणाले, ‘बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत बिनविरोध निवड केल्याबद्दल संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी, बँकेचा व्यवसाय व कर्जामध्ये वाढ याबाबीना प्राधान्य राहील. तसेच कर्ज व्याज दर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.’ सभेस संचालक बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, अर्जुन पाटील, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, एस. व्ही. पाटील, वर्षा केनवडे, पद्मजा मेढे नंदकुमार वाईंगडे, शिवाजी बोलके, गजानन कांबळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.निवडीप्रसंगी बँकेत सुकाणू समितीचे रविकुमार पाटील, जोतीराम पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर आदी  उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes