Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार

schedule09 Dec 25 person by visibility 613 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सध्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी पाच दिवसाची मुदत वाढवली. यापूर्वी दहा  डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार होती. आता प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर    निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्य  निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात मंगळवारी 9 डिसेंबर रोजी यासंदर्भातील नव्याने आदेश काढला. सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची  यादी 20 डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes