Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

केआयटीच्या अभिग्यानमध्ये यंदा सुदर्शन हसबनीस, संदीप वासलेकर, अभिनय बेर्डे ! विद्यार्थ्यांशी साधणार संवाद !!

schedule06 Nov 25 person by visibility 906 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑ  टेक्नॉलॉजी ऑफ इंजिनीअरिंगच्यावतीने (केआयटी) रविवारी (९ नोव्हेंबर २०२५) ‘अभिग्यान -२५’आयोजित केले आहे. सायबर संस्थेतील आनंदभवन येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. यंदा अभिग्यानचे तेरावे वर्ष आहे.

अभिग्यान अंतर्गत तंत्रज्ञान, सुरक्षा, कला, क्रीड, समाजकारण, साहित्य, सिनेमा क्षेत्रातील आयकॉन असणाऱ्या दिग्गजांना आमंत्रित केले जाते. ‘अभिग्यान -२५’मध्ये निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक लेखक संदीप वासलेकर, कम्प्युटर क्षेत्रातील तज्ज्ञ संजय काटकर, एआय क्षेत्रातील अभ्यासक चिन्मय गव्हाणकर, सिने कलाकार अभिनय बेर्डे, पत्रकार विलास बडे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अभिग्यान -२५ साठी आतापर्यंत विविध कॉलेजच्या ८०० विद्यार्थ्यांना सहभाग निश्चित केला आहे. सभागृहाची बैठक क्षमता ८५० पर्यंत आहे.

या पत्रकार परिषदेला वॉक विथ वर्ल्डचे समन्वयक प्रा. अमर टिकोळे, सहसमन्यवक प्रा. प्रसाद जाधव, प्रा. अमित वैद्य, व्यासपीठाचे विद्यार्थी पदाधिकारी आदित्य साळोखे, समीक्षा बुधले आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes