Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज ददआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवड

schedule05 Jun 26 person by visibility 201 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सध्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती बघता ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे बहुराष्ट्रीय कंपन्यात निवड होणे हे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड  टेक्नॉलॉजी महाविद्यालयासाठी खूपच अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंत वारणेमधून जगाच्या  कानाकोपऱ्यापर्यंत  अभियंते कार्यरत आहेत, म्हणजेच तात्यासाहेबांनी पाहिलेले नवा माणूस निर्माण करण्याचे स्वप्न वारणा परिसरात मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण झाले.’असे  मत श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.

निमित्त होते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड  टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालय आयोजित सन २०२५-२६ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवानिमित्त आयोजित केलेल्या प्लेसमेंट डेचे.

वारणा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले की, नवीन कौशल्य शिका, शिकलेली कौशल्य नव्याने आत्मसात करा, हीच कौशल्ये तुम्हाला यशाचा राजमार्ग दाखवतील. वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच.  पाटील  यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी प्लेसमेंटधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पाच लाख रुपयांचे पॅकेज मिळाल्याचे सांगितले.

याप्रसंगी निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांनी, सलोनी पाटील, श्रध्दा सावलगी, तन्वी पाटील, पूजा जावळे, तन्वी पाटील- केमिकल, पूजा साळोखे- पदवीका,यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी,  डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्रभारी प्राचार्य, डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे,  पॉलिटेक्निकचे प्राचार्य, डॉ . पी.आर. पाटील, प्रा. आर. सी. शिक्केरी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes