Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगेकेआयटी बेस्ट नॉलेज सेंटर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितडीवाय पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचमध्ये सहभागकागलमधील भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे - जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलसत्तेच्या गडबडीसाठी मुश्रीफांनी जनतेला फसविले, वापरा व फेका ही त्यांची निती - संजय मंडलिकांचा हल्लाबोलहिस्ट्री रिपीटस अगेन ! नेत्यांचे गळयात गळे – कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर !!राज्यस्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत मेन राजारामला सुवर्णपदक ! फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव !!विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अपडेट ज्युनिअर कॉलेजिअसचा आळशीपणा ! माध्यमिक शिक्षणकडून दोन दिवसाची मुदत !!शिक्षक बँकेतील राजकारण उफाळले ! सत्ताधारी- विरोधकांत वाकयुद्ध, आजी - माजींचा कारभार चव्हाटयावर!!चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणा

जाहिरात

 

गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री

schedule11 Apr 24 person by visibility 349 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. गुरुवारी  २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसातील ही सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.
 गेल्या वर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.
 “गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला्. गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देतो.” असे चेअरमन डोंगळे यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले. डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले.  मार्केटिंग सहायक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गोकुळचे  संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळोखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes