Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटनकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाईइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडेपदवीधर मतदारांच्या जागृतीसाठी पदवीधर संघटना मैदानात ! प्राध्यापक - शिक्षकांचा पुढाकार !!

जाहिरात

 

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाई

schedule26 Feb 26 person by visibility 125 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कर्तव्यपालनात कसूर आणि विनापरवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी चंदगड तालुक्यातील  माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली राजेंद्र मजकुरी यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सेवामुक्तीचे आदेश दिले.
डॉ. मजकुरी  यांची १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर काही दिवसांतच त्या आपल्या कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या पदाच्या जबाबदाऱ्यांचे पालन केल्यामुळे आणि प्रशासकीय शिस्तीचा भंग केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

‘आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य विभागात कार्यरत असणारे अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या कामात गैरवर्तन, अनधिकृत गैरहजेरी किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास, त्यांच्यावर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल."असे जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे यांनी म्हटले आहे.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
​.………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes